HW News Marathi
देश / विदेश

जगात कच्चा तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण

वेस्ट टेक्सास | जगात कोरोना वायरसमूळे नागरिकांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या कोरोनाचा फटका हा संपूर्ण जगाच् आर्थिक तिरोजीला लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती हा अमेरिकेत शुन्य डॉलरच्याही खाली आल्या आहेत. या तेलाच्या किमती १८ डॉलर प्रति बॅरेल वरुन -३८ डॉलरवर गेल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर काही बाबींची निर्मिती जरी बंद असली तरी तेल उत्पादन हे सुरुच आहे. मात्र, विमानसेवा, तसेच, लॉकडाऊनमुळे लोकांकडून जास्त तेलाची मागणी नसल्याकारणाने तेलाच्या किंमती ऐतिहासिक प्रमाणात घटल्या. १९९५ नंतर तेलाच्या किमतीत झालेली ही पहिली घसरण आहे.

कच्च्या तेलाच्या किमती या जगात फ्युचर्समध्ये होतात. वेस्ट टेक्सास हा अमेरिकेतील ट्रेडिंगचा बेन्चमार्क आहे. तिथल्या ट्रेडिंगनुसार तेलाच्या किमतीत ही झालेली घसरण फार मोठी आहे. जगात तेलाची मागणी जरी कमी झाली, तरीही सौदी अरेबिया, रशिया या ठिकाणी उत्पादन हे सुरुच आहे. एका दिवसात १०० मिलीयन बॅरल तेल तयार केले जाते मात्र त्याच्या साठवणूकीसाठी जागा नसल्याने बाजारात ३० डॉलर प्रति बॅरलने विक्रेत्याला विकावे लागेल. मात्र, साठा करायला काहो पर्याय नसल्याने कोणीही तेल विकत घेत नाही आहे.

दरम्यान, तेलाचा व्यवहार हा फ्युचर्समध्ये होतो आणि मेसाठीच्या फ्युचर्सचा अंतिम दिवस हा मंगळवारी (२१ एप्रिल) आहे. कोणत्याही कमोडीटीची खरेदी किंवा विक्री ही नफ्यासाठीच करतात. त्यामुळे हे फ्युचर्स संपण्याआधी तेलाची खरेदी केल्याने तेलाच्या बावात इतकी मोठी घसरण झाली आहे. या आधी तेलाच्या किंमतीतील कमालीची घट ही दुसऱ्या महायुद्धानंतर झाली होती. तसेच, जुनसाठीच्या फ्युचर्सची किंमत ही सध्या १६ टक्क्यांनी कमी होऊन २२ डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. भारत ८० टक्के तेल आयात करते. त्यामूळे भविष्यात भारताला अधिक किंमत देऊन तेल खरेदी करावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | मुख्यमंत्र्यांचे काम चांगलेच पण आम्हालाही विश्वासात घ्यायला हवे !

News Desk

सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नाहीत, UPA ला सक्षम करण्यासाठी शरद पवारांनी नेतृत्व करावं – संजय राऊत

News Desk

दिवस मावळल्यानंतरही लाईट लावून फडणवीसांचा पाहणी दौरा सुरूच

News Desk