HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीच्या औरंगजेब रोडवर स्फोट,बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

दिल्ली | देशाची राजधानी असेलल्या दिल्लीमधून एक अत्यंत महत्वाची बातमी हाती येत आहे.दिल्लीतील औरंगजेब रोडवर असलेल्या इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. अगदी काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं.

या स्फोटामध्ये आजूबाजूच्या परिसरातील काही गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. अद्याप कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. हा स्फोट कमी तीव्रतेचा असला तरी सध्या दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील सर्व सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांसाठी वाढवावी | शहा

News Desk

जेएनयूच्या जीवघेण्या हल्लाचा देशभरातील विद्यार्थ्यांसह दिग्गज नेत्यांनी नोंदविला निषेध

News Desk

अब्दुल कुरेशी या दहशतवाद्याला दिल्लीत अटक

swarit