Site icon HW News Marathi

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत CBI कोठडी

मुंबई | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना पाच दिवसांची सीबीआय (CBI) कोठडी सुनावण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील मद्य धोरणात बदल करतना आर्थिक लाभ मिळविल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. यानंतर मनीष सिसोदिया यांना आज (27 फेब्रुवारी) राऊज अवेन्यू न्यायालयात हजर करण्यात आला आहे. राऊज अवेन्यू न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावणीली आहे.

मनीष सिसोदिया यांच्या सांगण्यावरून कमिशन 5 कोटीवरून 12 कोटी रुपये करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मनीष सिसोदिया यांना रिमांड आवश्यक असल्याचा मुद्दा सीबीआयने न्यायालयात मांडला होता. यावर मनीष सिसोसिदया यांच्या वकिलाने न्यायालयात नायब राज्यपालांच्या मंजुरीनंतर कमिशनमध्ये वाढ करण्यात आल्याचे सांगितले. यासंदर्भात राज्यपालांना सगळी माहिती होती.” मद्य धोरणाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता होती.”

सीबीआयने मनीष सिसोदिया यांना अटक केल्यापासून दिल्लीसर देशभरात आंदोलन सुरू आहेत. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध केला आहे. “सीबीआय अधिकारी मनीष सिसोदियांच्या अटकेच्या कारवाई विरोधात होते, असे मला काही जणांनी सांगितले असून प्रत्येकाला त्यांच्याबद्दल आदर आहे. मनीष सिसोदिया यांच्या विरोधात पुरावे नाही. तरी देखील त्यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयवर ऐवढा राजकीय दबाव होता की त्यांना अटक करावे लागले”, असे केजरीवाल यांनी ट्वीट करत सीबीआयसह भाजपवर निशाणा साधला

 

 

Exit mobile version