HW News Marathi
Covid-19

चिंताजनक ! दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

मुंबई | देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सर्वसामन्यापासून ते राजकीय नेते मंडळ यांना देखील कोरोनाचा संसर्ग होत आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंत तीन नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनाच कोरोाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली आहे. सत्येंद्र जैन यांची कोरोनाची दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याआधी केलेली कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती.

दरम्यान, दिल्लीत कोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका बोलविली होती. या बैठकीत आरोग्यमंत्री म्हणून सत्येंद्र जैन उपस्थित होते. आरोग्यमंत्र्यापाठोपाठ आपच्या आमदार आतिषी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. अरविंद केजरीवाल ताप आणि खोकल्याच्या त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र, त्यांच्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….नाहीतर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, केंद्रीय गृहमंत्रालयाची राज्यांना कडक सूचना

News Desk

केंद्राच्या अनलॉक-५च्या गाईडलाईन्स जारी, चित्रपटगृह सुरू करण्यास केंद्राची परवानगी!

News Desk

वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृतीदल स्थापन

News Desk