HW News Marathi
देश / विदेश

छेडछाडप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्षाच्या मुलावर कठोर कारवाईची मागणी

हरयाणा – येथील भाजपा प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र त्याला अटक करून लगेचच जामिनावर सोडून देण्यात आले. याचा विरोधी पक्षाने कडाडून निषेध केला आहे. तसेच मुलाबरोबर सुभाष बराला यांच्याही अटकेची मागणी केली आहे.
चंदीगडमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची छेड काढल्या आणि पाठलाग केल्याप्रकरणी बराला यांच्या मुलावर 2 दिवसांपूर्वी गुन्हा नोंदविण्यात आला होता. सध्या या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस चे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही या वादात उडी घेतली असून भाजपावर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, पीडित मुलीने तिच्या फेसबुक वॉलवर आपबीती कथन केली आहे. त्या दिवशी आपल्यावर बलात्कार आणि खून होऊ शकला असता, असे पीडितेने म्हटले आहे आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेलंगणामध्ये पार पडला समलैंगिक जोडप्याचा विवाह सोहळा

Aprna

Republic Day | ‘एक झेंडा हिरवळीचा’ शालेय विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

News Desk

मराठीत ट्विट करत पंतप्रधान मोदींनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

News Desk