Site icon HW News Marathi

अवैध खाण प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स

मुंबई |  झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना अवैध खाण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. सोरेन यांना उद्या (३ नोव्हेंबर) केंद्रीय तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी ईडीने सोरेन यांच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. या छापेमारीमध्ये ईडीकडून सोरेन यांचे एक पासबूक आणि चेकबूक जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात ईडीने सोरेनचा सहकारी पंकज मिश्रा याला आधीच अटक केले आहे. या तपासात ईडीला झारखंडमधील पंकज मिश्रा आणि त्यांच्या व्यावसायिक सहकाऱ्यांशी संबंधित असलेल्या 18 ठिकाणी छापे टाकले.

ईडीने मार्च महिन्यामध्ये मिश्रा आणि इतरांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA ) गुन्हा दाखल केले होते. पंकज मिश्रा यांच्यावर बेकायदेशीरपणे सोरेन मोठी मालमत्ता जमा केली, असा आरोप केला गेला. यानंतर यात आरोपी पंकज मिश्राकडून मिळालेल्या 42 कोटी रुपयांच्या गुन्ह्यांची नोंद आजपर्यंत करण्यात आली आहे. पीएमएलए तपासात उघड झाले आहे की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा बरहैट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.  साहेबगंज आणि त्याच्या लगतच्या भागातील अवैध खाण व्यवसाय आहे.

पंकज मिश्रा आणि इतरांविरुद्ध एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला. या तपासादरम्यान, ईडीने अनेक तारखांना भारतभर 47 ताब्यात होती. यावेळी 5.34 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आले. तर तेव्हा ईडीने मिश्रांची 13.32 कोटी रुपयांची बँक बॅलन्स गोठवली गेली. अंतर्देशीय जहाज MV Infralink-III जप्त करण्यात आले. पाच स्टोन क्रशर, दोन हायवा ट्रक याशिवाय दोन एके 47 असॉल्ट रायफलसह दोषी कागदपत्रे जप्त करण्याची नोंद करण्यात आली.

 

 

 

Exit mobile version