Site icon HW News Marathi

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त उर्मिला मातोंडकर सहभागी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | बॉलिवूडची सुप्रिसद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आलेली आहे. ही यात्रा सध्या काश्मीरच्या जम्मू येते आली आहे.  उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा राजकीय मैदानात सक्रिय झालेल्या दिसून आल्या आहे. उर्मिला मातोंडकर या यात्रेत सहभागी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

उर्मिला मातोडकर यांनी यात्रेत सहभागी झालेल्याचा व्हिडिओ स्वत: ट्वीट केला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी राजकीय कारकीर्दीला काँग्रेसपासून सुरुवात केली होती. काँग्रेसकडून उर्मिला मातोडकर यांना लोकसभासाठी उमेदवारी दिली होती. परंतु, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उर्मिला मातोडकर यांनी भाजपच्या भाजपचे गोपाळ शेट्टी विरोधात निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत उर्मिला मातोडकर यांचा पराभव झाला. यानंतर उर्मिला मातोडकर यांनी शिवसेनेते प्रवेश केला.

 

Exit mobile version