Site icon HW News Marathi

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन

मुंबई | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे निधन झाले आहे. परवेज मुशर्रफ यांनी दुबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती पाकिस्तानच्या माध्यमांनी दिली आहे. परवेज मुशर्रफ यांनी  वयाच्या ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. परवेज मुशर्रफ यांना अमायलोइडोसिस आजाराने ते प्रदीर्घ काळापासून झुंज देत होते. परंतु, परवेज मुशर्रफ यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली.

1999 ते 2008 दरम्यान माजी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष म्हणून यांनी महत्वाची भूमिका बजावली. 2016 पासून परवेज मुशर्रफ हे दुबईमध्ये होते. परवेज मुशर्रफ यांच्यावर प्राणघातक हल्ले देखील करण्यात आले होते. यानंतर परवेज मुशर्रफ यांच्यावर पाकिस्तान सोडण्याची देखील वेळ आली होती. पाकच्या वादळी काळात परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानेच नेतृत्व केले होते.

पेशावरच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने परवेश मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. परवेज मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या आरोपात इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. परंतु, लाहोर उच्च न्यायालयाने परवेज मुशर्रफ यांना सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय दिला होता.

परवेज मुशर्रफ यांनी नवाब शरीफ यांना हटवून सत्ता काबीज

परवेज मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी लष्कर प्रमुख पदावरून हटविले होते. परवेज मुशर्रफ त्यांच्या जागी जनरल अजीज यांना लष्कर प्रमुख बनविले. या संपूर्ण प्रकरणाची नवाज शरीफ यांना कल्पना नव्हती. अखेर परवेज मुशर्रफ यांनी लष्कराच्या जोरावर पाकिस्तानची सत्ता काबीज करत नवाज शरीफ यांना सत्तेतून बाहेर काढले.

परवेज मुशर्रफ यांचा अल्प परिचय

परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज भागात झाला होता. परंतु, 1947 मध्ये भारताच्या फाळणीच्या काही दिवसाआधी त्यांचे संपूर्ण कुटुंबाने पाकिस्तानात जाऊन स्थायी होण्याचा निर्णय घेतला. परवेज मुशर्रफ यांचे वडील हे पाकिस्तान सरकारमध्ये काम करत होते. त्यांच्या वडिलांची पाकिस्तानातून तुर्कीला बदली झाली होती. 1949 परवेज मुशर्रफ हे तुर्कीला गेले. यानंतर त्यांनी काही काळ आपल्या कुटुंबासह तुर्कीत राहिले होते. यामुळे परवेज मुशर्रफ यांना तुर्की भाषा येत होते. यानंतर परवेज मुशर्रफ यांचे कुटुंब 1957 मध्ये पाकिस्तानात परतले. त्यांनी शिक्षण कराचीच्या सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले तर लाहोरच्या फोरमन ख्रिश्चन कॉलेजमध्ये त्यांचे पवीधरचे शिक्षण झाले होते. परवेज मुशर्रफ हे 1974 साली पाकिस्तानच्या सैन्यात रुजू झाले होते. यानंतर त्यांनी 2001 ते 2008 या कालावधीत पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते.

 

Exit mobile version