Site icon HW News Marathi

‘भारत जोडो यात्रे’त आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन सहभागी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) ही राजस्थानमध्ये आहे. भारत जोडो यात्रा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू आहे. या यात्रेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) सहभागी झाले आहे. रघुराम राजन यांनी सवाई माधोपुर येथील भदौतीमध्ये भारत जोडो यात्रा आली आहे. या यात्रेत आज (14 डिसेंबर) रघुराम राजन सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियावर राहुल गांधी हे रघुराम राजन यांच्यासोबत फोटो टाकले आहे. यानंतर राहुल गांधी आणि रघुराम राजन यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर वेळोवेळी टीका करत असतात. “जगामध्ये भारताची प्रतिमा ही अल्पसंख्यांक विरोधी बनली तर परदेशी सरकार आपल्या देशावर विश्वास ठेवायला तयार होणार नाही. यामुळे भारतीय कंपन्यांचे नुकसात होऊ शकते. भारतीय उत्पादकांसाठी ही मोठी धोक्याची घंटा आहे.”

रघुराम राजन कोण आहेत

रिझर्व्ह बँकेचे (RBI) 23 वे रघुराम राजन हे गव्हर्नर होते. रघुराम राजन हे आयआयटी दिल्लीच्या बीटेक आणि आयआयएम अहमदाबादमधून व्यवस्थापन पदवी आणि एमआयटीमधून पीएच.डी. केली आहे.  पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात म्हणजे 2013 मध्ये रघुराम राजन यांनी आरबीआयच्या गव्हर्नर पदाचा कार्यभार स्वीकारला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातही रघुराम राजन हे देशाचे गव्हर्नर राहिले होते. 2016 मध्ये रघुराम राजन यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. यानंतर उर्जित पटेल हे आरबीआयचे गव्हर्नर झाले.

 

Exit mobile version