HW News Marathi
देश / विदेश

गोरखपूर बालमृत्यू प्रकरणी ऑक्सिजन पुरवणाऱ्याला अटक

गोरखपूर- बीआरडी मेडिकल कॉलेज दुर्घटनेत शेकडो चिमुकल्यांच्या मृत्यूप्रकरणी पुष्पा सेल्सचे मालक मनीष भंडारी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी कोर्टात अर्ज देऊन आत्मसमर्पणाची परवानगी मागितली होती. तथापि, गोरखपूर बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये7 ते 12 ऑगस्टदरम्यान 30 लहान मुलांसमवेत60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि पुष्पा सेल्सदरम्यान पेमेंटवरून वाद असल्याने कंपनीने हॉस्पिटलचा ऑक्सिजन सप्लाय बंद केल्याचा आरोप आहे. तसेच चिमुकल्यांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच झाल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी 9 जणांना आरोपी करण्यात आले आहे. यात 8 जणांना अगोदरच अटक करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनोहर पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार

swarit

पावसासाठी दोन पुरुषांचा एकमेकांशी विवाह

News Desk

या समुद्रात बुडून दाखवाच!

News Desk