मुंबई | देशात गेल्या २४ तासांत ७ हजार ४६६ नव्या कोरोना रुग्णांची सर्वाधिक नोंद झाली आहे. एका दिवसात झालेली विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढली आहे. तर एका दिवसात १७५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर आता देशात १ लाख ६५ हजार ७९९ वर पोहोचली आहे. देशाता आतापर्यंत ७१, १०५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. तसेच देशात ४ हजार ७०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे असून देशात सध्या ८९, ९८७ जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज (२९ मे) दिली आहे.
Highest spike of 7,466 new #COVID19 cases in the last 24 hours in the country; 175 deaths reported. Total number of cases in the country now at 165799 including 89987 active cases, 71105 cured/discharged/migrated and 4706 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/YbEb1HbDsl
— ANI (@ANI) May 29, 2020
दरम्यान, देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. राज्यात ५९,५४६ वर. या रुग्णांपैकी १,९८२ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू राज्य. तामिळनाडूत १९ हजार ३७२ रुग्ण. या रुग्णांपैकी १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातला मागे टाकत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत १,०२४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत आतापर्यंत १६ हजार २८१ रुग्ण आढळले आहेत. यांपैकी ३१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, गुजरातमध्ये एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे १५ हजार ५६२ वर. तर, राज्यात ९६० जणांचा मृत्यू झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.