HW News Marathi
देश / विदेश

युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागून जखमी, रुग्णालयात उपचार सुरू; व्हीके सिंग यांची माहिती

नवी दिल्ली | रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘गंगा मोहीम’ राबवली आहे. भारतीय विद्यार्थ्याला युक्रेनमध्ये गोळी लागल्याची माहिती एनआयएन वृत्त संस्थेने माहिती दिली आहे. कीवमधून निघताना गोळीबारीत जखमी झालेला विद्यार्थ्यावर उपचार सुरू आहे. आम्ही नागरिकांना कमीत कमी नुकसानीत स्थलांतर करण्याचे प्रयत्न करत आहेत, अशी माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी दिली आहे. यापूर्वी भारतातील एका विद्यार्थ्याचा गोळीबारीत मृत्यू झाला होता.   

दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने ४ मंत्र्यांना शेजारील देशात पाठवले आहे. यात केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांचा समावेश आहे. युक्रेनमधून आतापर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यात केंद्राला यश आले आहे. अजूनही काही विद्यार्थ्यी युक्रेनेमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेशात आणण्यासाठी सरकारवर प्रयत्न करत आहे.

युक्रेनच्या खारकिव्हमध्ये रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव नवीन शेखरप्पा असे असून हा कर्नाटकमधील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. तर २ मार्चलाही युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाली असून या मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव चंदन जिंदाल आहे. हा विद्यार्थ्यी पंजाबचा रहिवासी असून जिंदालची तब्यात बिघडल्यामुळे आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, जिंदाल यांचे नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालायाने माहिती दिली.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्नीला गोळी मारण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन मुक्तता देणे केव्हाही चांगले !

News Desk

भारताचे ‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल

News Desk

#CoronaVirus | ‘कोरोना’विरोधी लढाईत बीसीसीआय करणार ५१ कोटींची मदत

News Desk