HW News Marathi
देश / विदेश

तब्बल ६० तासांच्या संघर्षानंतर विंग कमांडर अभिनंदन मायदेशी परतले

नवी दिल्ली | पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान आज (१ मार्च) अखेर मायभूमीत सुखरूप परतले आहेत. तब्बल ६० तासाच्या संघर्षानंतर अभिनंदन भारता परतला आहे. पाकिस्ताननी सैनिकांनीसोबत अभिनंदन हे वाघा बॉर्डरच्या सीमेवर दाखल झाले. वाघा बॉर्डरच्या भारतीय बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी अभिनंदन यांचे स्वागत केले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा वाघा बॉर्डरचे दरवाजे सुर्यास्तनंतर उघडण्यात आली आहे.

“विंग कमांडर अभिनंदनला भारताकडे सोपविण्यात आले आहे. ते विमान दुर्घटनेत जखमी झाले असल्यामुळे आम्ही त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. अभिनंदन भारता येण्याने आम्ही खूप आनंदी आहोत,” असे एअर व्हॉईस मार्शल आर.जी. के. कपूर यांनी अटरी वाघा बॉर्डवर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले आहे.

विंग कमांडर अभिनंदन यांचे मायदेशात स्वागत आहे. तुमच्या या शौर्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. १३० कोटी भारतीयांसाठी आपले सैन्य हिच मोठी ताकद आणि प्रेरणा आहे. वंदे मातरम्, असे प्रेणादायी ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

“विंग कमांडर अभिनंदन तुमची प्रतिष्ठा, संयम आणि बाहदूरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमचे मायदेशा स्वागत, तुम्हाला खूप प्रेम,” या शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून विंग कमांडरचे अभिनंदनचे स्वागत केले आहे.

प्रिय, विंग कमांडर अभिनंदन, संपूर्ण देशाला तुमच्या शौर्य आणि धैर्याचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही परत आलात याचा संपूर्ण भारताला आनंद आहे. तुम्ही देश सेवा करत राहला, देशाची सेवा तितक्याच समर्पक भावाने करत रहाल, तुमच्या उज्ज्व भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा !, अशा शब्दात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्वीक करून अभिनंदनचे स्वागत केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) त्यांच्या संसदेत घोषणा की, “शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या (१ मार्च) सुटका करणार असल्याची माहिती मिळाली दिली होती. अभिनंदन यांना बिन शर्त सोडविण्यात आली आहे. भारतीय वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने बुधवारी (२७ फेब्रुवारी) आपले लढाऊ विमान भारताच्या हवाई हद्दीत आणत पुन्हा कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पाकिस्तानचे लढाऊ विमान परतवून लावताना भारताचे ‘मिग-२१’ हे लढाऊ विमान कोसळले. याच दरम्यान भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या हाती लागले. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर तातडीने भारताकडून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. अखेर भारताच्या या प्रयत्नांना मोठे यश आले असून भारतीय कमांडर अभिनंदन सुखरूप भारतात परतले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता’, राजनाथ सिंह यांनी चिंता दर्शवली

News Desk

हैदराबादमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग, ११ मंजुरांचा मृत्यू

Aprna

“सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली”, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

News Desk