HW News Marathi
Covid-19

धक्कादायक! नवी नवरीच निघाली कोरोना पॉझिटिव्ह, तर वऱ्हाडी झाले क्वारंटाईन

मुंबई | मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यामधील मंडीदीपच्या सतलापूनमध्ये एक नवविवाहितेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नववधूला कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ माजली आहे. नववधूने लग्नाआधी ताप आला म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, लग्नानंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे नववधूला थेट भोपाळच्या एम्समध्ये तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

तसेच लग्नसोहळ्याला उपस्थित असलेले दोन्ही पक्षाकडील कुटुंबीय, पाहुणे आणि लग्न लावणाऱ्या भटजीसह ३२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यामधील ही घटना आहे. हा लग्नसोहळा १८ मे रोजी सतलापूरमध्ये पार पडला. तरही तरुणी भैपाळच्या जाटखेडीमध्ये राहते.

मध्य प्रदेशमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गुरुवारी राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७३५ झाली आहे. तर २७३३ लोक बरे झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मध्य प्रदेशमध्ये २६७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुक्त झालेल्यांची प्लाझ्मा देत कोरोनाग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात

News Desk

मुंबईत पालिकेने रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी ‘या‘ टिप्स अवलंबल्या

News Desk

राज्यांत आज ९५१८ नवे रुग्ण तर ३०९६ रुग्ण झाले कोरोनामुक्त!

News Desk