Site icon HW News Marathi

विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल; पंजाब महिला आयोगाने घेतली दखल

मुंबई | पंजाबमध्ये चंदीगड विद्यापीठातील (Chandigarh University) 60 विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी विद्यापीठात आंदोलनाचा पवित्रा घेतला असून जोपर्यंत दोषींवर कठोर शिक्षा कारावी, अशी मागणी केली जात आहे. विद्यापीठातील एका विद्यार्थीनीनेच व्हिडिओ लीक केल्याची माहिती मिळाली असून त्या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. आणि या प्रकरणाची गंभीर दखल पंजाब महिला आयोग आणि पंजाबचे शालेय शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैंस यांनी घेतली आहे.

दरम्यान, विद्यार्थिनींचा व्हिडिओ लीक झाल्यानंतर विद्यार्थ्यींनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु, पोलिसांनी स्पष्टीकरणे देत सांगितले की, विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला नसून यासर्व अफवा आहेत. हा व्हिडीओ लीक झाल्याचे समजल्यानंतर एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे विद्यापीठा प्रशासनाने सांगितले आहे.

व्हिडिओ लीक करणाऱ्या पोलिसांनी त्या विद्यार्थींनीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्या विद्यार्थींनीविरोधात एआयआर नोंदविली आहे. या विद्यार्थीनींचे अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता. आणि त्या विद्यार्थीनी तिच्या ओळखीच्या तरुणाला पाठविला होता. या तरुणाने हे व्हिडिओ इंटरनेटवर टाकले. यानंतर हे व्हिडिओ व्हायरल झाले.

 

 

 

 

Exit mobile version