Site icon HW News Marathi

गुजरातसाठी भाजपच्या ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीची (Gujarat Assembly Election )रणधुमाळी रंगू लागली आहे. या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी प्रचारासाठी सज्ज झाले आहेत. पुन्हा गुजरातमध्ये भगवा फडकविण्यासाठी भाजपने त्यांच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक त्यांच्या यादीत समावेश आहे.

दरम्यान, भाजपने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री नितीन पटेल या दोघांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. परंतु, रुपाणी आणि पटेल हे दोघेही गुजरात विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले होते. गुजरात विधानसभा दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यात गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांची अशी आहे यादी

 

 

Exit mobile version