Site icon HW News Marathi

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प (Budget 2023) मांडला आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकारने रेल्वेसाठी 2 लाख 40 हजार कोटींची तरतूद केली आहे. रेल्वेसाठी (Railway) आतापर्यंत मोठी तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेसाठी ही सर्वात मोठी आर्थिक मदत आहे.

दरम्यान, यापूर्वी 2013-14 च्या तुलनेत 9 पट मदत केली आहे. तसेच 50 नवी विमानतळे उभारण असल्याची घोषणा निर्माला सीतारामण यांनी केली आहे. रेल्वेमध्ये 100 नवीन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार पुढे काम केले जाणार आहेत. यात रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच रेल्वेत डिजिटल तिकीट प्रणालीचा अवलंब करण्यात येणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले.

तसेच गत वर्षी 2022 मध्ये केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयातून एकूण 140367.13 कोटी रुपये दिले होते. गेल्या वर्षापासून रेल्वेसाठी 20 हजार कोटीहू अधिक वाढ करण्यात आली आहे.

 

 

Exit mobile version