Site icon HW News Marathi

Independence Day 2022 : जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

आज 75 वा स्वातंत्र्यदिन ! सुमारे 150 वर्षांनी गुलामगिरीच्या पाशातून मुक्त होऊन भारताला अखेर ब्रिटिशांच्या राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. आपल्या लाखो-करोडो स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारकांनी देशांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या त्यांच्या प्राणांच्या आहुतीचे सोने झाले.

 

स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर (Red Fort) स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवून पहिला स्वातंत्र्य दिन साजरा केला. ह्या लाल किल्ल्यावरच स्वातंत्र्यदिन साजरा होण्याचे मोठे कारण म्हणजे ‘भारत स्वतंत्र झाला ‘ ही बातमी पहिल्यांदा पंडित नेहरू यांनी ह्याच किल्ल्यावरून घोषित केली होती. ह्या लाल किल्ल्याचा इतिहास आता आपण पाहू:

काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास –

भारताची राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती भागात असलेला एक ऐतिहासिक किल्ला म्हणजे लाल किल्ला! सुमारे 200 वर्षांपूर्वी म्हणजे 1856  सालापर्यंत हा किल्ला म्हणजे मुघल राजवंशातील महाराजांचे निवासस्थान होते. केवळ मुघल महाराजांचे निवास्थानच नव्हे तर हा किल्ला म्हणजे मुघल राज्याचे राजकीय आणि औपचारिक केंद्रही होते. ह्या किल्ल्याच्या भीती लाल रंगाच्या वाळूच्या खडकांच्या असल्याने त्याला लाल किल्ला असे नाव पडले. पाचवा मुघल सम्राट शाह जहान याने 1639  साली यमुनेच्या किनारी लाल किल्ला बांधायला सुरुवात केली जो 1648 साली बांधून पूर्ण झाला. ब्रिटिशांनी 1857 च्या बंडानंतर किल्ल्यातील बऱ्याचशा मौल्यवान संगमरवरी संरचना नष्ट केल्या.

या किल्ल्याचे विशेष म्हणजे त्याची स्थापत्यशास्त्र होय! लाल किल्ल्यातील रंग महाल , मुमताज महाल , खास महाल, हम्माम, शाह बुर्ज़, दीवान ए खास ह्या काही अवश्य पाहाव्यात अशा वस्तू आहेत. लाल किल्ल्यातील रंग महाल , मुमताज महाल , खास महाल, हम्माम, शाह बुर्ज़, दीवान ए खास ह्या काही अवश्य पाहाव्यात अशा वास्तू आहेत. छावरी बाजार जो लाल किल्ल्याच्या समोर आहे, किल्ल्याच्या मुख्य दाराला ‘लाहोरी दरवाजा’ म्हणतात जिथे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताचे पंतप्रधान तिरंगा फडकावून भाषण करतात, ह्या किल्ल्याचा दक्षिण दिशेचा दरवाजा हा पर्यटकांसाठी खुला केला जातो, रंग महाल हा राजाच्या पत्नींसाठी होता.

ज्या किल्ल्यावरून संपूर्ण देशाने “आपला देश स्वातंत्र्य झाल्याची” घोषणा सर्वप्रथम आपल्या पहिल्या पंतप्रधानांकडून ऐकली. त्याच लाल किल्ल्यावर पुढील प्रत्येक वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी तिरंगा फडकवून, देशाला उद्देशून भाषण देण्याची प्रथाच पडली जी आजपर्यंत अखंड सुरु आहे.

Exit mobile version