HW News Marathi
मनोरंजन

चिंताजनक !आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, देशात एका दिवसात ४५ हजार कोरोना रुग्ण आढळले

नवी दिल्ली | देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ इतकी झाली आहे. आतापर्यंत ७ लाख ८२ हजार ६०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ४ लाख २६ हजार १६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

गेल्या २४ तासांत देशात ४५,७२० रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंत वाढलेली सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. १ हजार १२९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबळींची संख्या २९ हजार ८६१ इतकी झाली आहे.  देशात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kumbh Mela 2019 | मोदीजी रामाला एक घरही नाही देऊ शकले ?

Atul Chavan

माधुरी दीक्षित बनविणार मराठी चित्रपट

News Desk

मकरसंक्रांतीशी स्त्रिया-नवजात बालकांचे विशेष नाते

News Desk