Site icon HW News Marathi

क्रिकेटर ऋषभ पंत यांच्या कारचा भीषण अपघात; पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दिल्ली-देहरादून महामार्गावरील रेलिंगला ऋषभ पंतची कार धडकली आणि यानंतर कारने पेट घेतला.  ऋषभ पंतच्या डोक्याला, गुडघ्याला, पाठिला आणि पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. ऋषभ पंतवर देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आले.

दरम्यान, ऋषभ पंतवर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीआहे. ऋषभ पंत हा स्वत: कार चालवित होता. कार चालविताना ऋषभ पंतला डोळा लागल्यानंतर अपघात झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. स्थानिकांनी ऋषभ पंतला रुग्णालयात दाखल केले. सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. ऋषभ पंत हा दिल्लीहून उत्तराखंडमध्ये घरी जाणार होता. तेव्हा ऋषभ पंतचा अपघात झाला होता.

 

ऋषभ पंतच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असून त्यांच्या उपचारासाठी सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. आणि ऋषभ पंतचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीने म्हटले आहे.

Exit mobile version