HW News Marathi
देश / विदेश

चांद्रयान -२ आज अवकाशात झेपावणार

श्रीहरिकोटा । देशाची महत्त्वाकांक्षी चांद्रयान – २ आज (२२ जुलै) दुपारी २.४३ मिनिटाने श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावणार आहे. चांद्रयान – २ मोहीमेचे काऊंटडाऊन रविवारी (२१ जुलै) संध्याकाळी ६.४३ वाजता सुरू झाले. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाच्या मदतीने चांद्रयान १५ जुलैला होणारे लॉन्चिंग तांत्रिक अडचणींमुळे इस्त्रोने स्थगित केले होते. चांद्रयान सप्टेंबरपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन यांनी सांगितले की, १५ जुलैला चांद्रयान – २ च्या प्रक्षेपणात आलेल्या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या असल्याचे सांगितले आहे. चांद्रयान तांत्रिक कारणांमुळे लॉन्चिंग काऊंटडाऊनच्या जवळपास ५६ मिनिट आधीच मोहीम स्थगित करण्यात आली होती. वेहिकल सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून चांद्रयान-२ चे लॉन्चिंग थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे इस्रोने घेतला होता.

चांद्रयान- २ मोहिमेला विलंब का झाला ?

चांद्रयान- २ मध्ये क्रायोजेनिक इंधन भरताना तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने काऊंटडाऊन थांबवण्यात आले. इंधन टँकमधून सगळे इंधन काढून पुन्हा तपासणीसाठी आठवडाभर वेळ गेला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर ५२ दिवसांनी चांद्रयान २ चंद्रावर पोहोचेल. झेप घेतल्यानंतर हे चांद्रयान १६ दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे.

भारत अशा प्रकारची मोहीम राबवणारा पहिलाच देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताचे जवळपास ९७८ कोटी रुपये खर्च आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे चांद्रयान सर्व भाग स्वदेशी बनावटीचे आहे. या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, त्यावर उपलब्ध असलेली खनिजे, रसायने आणि त्यांचा अभ्यास केला जाणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस आणि राज्यपालांच्या भेटीबद्दल राजकीय वर्तृळात रंगल्या चर्चा

News Desk

भाजपा महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष बदलावर रावसाहेब दानवे म्हणाले…..

News Desk

राकेश अस्थाना यांची चौकशी सुरूच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका

News Desk