Site icon HW News Marathi

इस्रोकडून तीन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीभोवतीच्या कक्षेत केले स्थापित

मुंबई | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आज स्मॉल सॅटेलाइट लॉन्च केले आहे. इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज (10 फेब्रुवारी) स्मॉल सॅटेलाइटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. या उपग्रह अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट (EOS 07), अमेरिकन कंपनीचा ‘जानस 1’ आणि देशातील विद्यार्थिनींनी बनविलेला ‘आझादीसॅट 2’ आणि इस्रोचा EOS-07 हा लहान उपग्रहांना 450 किलोमीटर अंतराच्या वर्तुळाकार कक्षेत स्थापित केले आहेत.

 

इस्रोने सर्वात छोटा उपग्रह SSLV D2 चे आज प्रायोगिक उड्डाण यशस्वीरित्या पार पडले असून यात SSLV उपग्रहाचे पहिले प्रक्षेपण अयशस्वी ठरले होते. यानंतर आज या उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाले आहे. SSLV रॉकटे 34 मीटर उंचीचा आणि याचा व्यास 2 मीटर ऐवढा असून हा उपग्रहाचे एकूण वजन 120 टन घेऊन उड्डाण करू शकतो.  हा उपग्रहांना कमी वेळेत आणि कमी खर्चात अवकाशात पाठविण्यासाठी इस्रोच्या वतीने ‘एसएसएलव्ही’ नव्या रॉकेटची निर्मिती करण्यात आली आहे.

 

दरम्यान, SSLV-D2 चे वजन 175.2 किलो आहे. यामध्ये इओएस हा उपग्रह 156.3 किलो वजन, जानस 1 आणि आझादीसॅट 2 या उपग्रहाचे वजन 8.7 किलो आहे, असे इस्रोने एसएसएलव्ही रॉकेटची किंमत जवळपास 56 कोटी रुपये ऐवढी आहे.

 

https://twitter.com/ANI/status/1623892081667350528?s=20&t=H7w5cH6Nqj6X94q51dDxzQ
Exit mobile version