Site icon HW News Marathi

महान एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती

मुंबई | महान एअरलाईन्सच्या (Mahan Airlines) विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली आहे. हे  W581 विमान इराणच्या तेहरानहून चीनच्या ग्वांगझूला निघाले होते. या विमानात इराणी प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या विमानने भारताच्या हद्दीत प्रवास करत होते.

दरम्यान, विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर दिल्लीच्या विमानतळावर एमरजन्सी लँडिंगची परवानगी नाकारली. यानंतर जयपूर विमानतळावर उतरवण्याची सूचना केली. परंतु, विमानाच्या वैमानिकाने विमान जयपूरला उतरण्याचा नकार दिला. आणि भारताच्या हवाई हद्द सोडून चीनच्या दिशेने गेले..

हे विमानात बॉम्ब ठेवल्याच्या बातमीनंतर भारतीय हवाई दल अॅक्शन मोडमध्ये आले. तर सुखोई विमानाचे उड्डाण केले असून भारतीय हवाई हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सुखोई विमानाला पाठवले. हा या मागचा मुख्य हेतू होता. यामुळे विमानाला भारताच्या हवाई हद्दीतून लवकर बाहेर निघणे शक्य होईल.

 

 

 

 

Exit mobile version