HW News Marathi
देश / विदेश

श्नीनगर-जम्मू महामार्गावर बनिहाल येथे कारमध्ये स्फोट

श्रीनगर | श्नीनगर- जम्मू महामार्गावर बनिहाल येथे स्फोट झाला आहे. सॅन्ट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोटची झाल्याची माहिती समोर आली आहे. सीआरपीएफच्या ताफा तेथून जात असताना कारमध्ये स्फोट झाला. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. या स्फोटात कोणीही जखमी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

कारमधून केमिकल, स्फोटके आणि एलपीजी सिलेंडर्स नेले जात असताना हा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची अधिक चौकशी केली जात आहे. या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे. त्या भागाची सुरक्षा जवानांनी घेराबंदी केली आहे. याआधी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दीड महिन्यांनी अशाच प्रकारचा भ्याड हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसैनिकांवर कारवाई करा, महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, नवनीत राणांची पत्रातून मागणी

News Desk

ठाणे आणि दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती! – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Aprna

१५ ऑक्टोबरपासून देशांत शाळा सुरु होणार, केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स…

News Desk