HW News Marathi
देश / विदेश

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

अनंतनाग | जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणेत जोरदार चकमक झाली. या चकमकीदरम्या सुरक्षा यंत्रणेला २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. अनंतनागमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांदेखील दहशतवाद्यांच्या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर दिले.

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी (१४ जून) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये चकमक सुरू झाली होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशाच्या सीमेवर कोणतीही घुसखोरी झालेली नाही। पंतप्रधान मोदी  

News Desk

कोरोनापासून वाचण्यासाठी पंतप्रधान करणार जनआंदोलन!

News Desk

इंडोनेशियात ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

News Desk