HW News Marathi
देश / विदेश

23 वर्षांपासून ती राखतेय नखांची निगा…

टेक्सास- आयना विल्यम्स या महिलेने २३ वर्षांपासून आपल्या दोन्ही हातांची नखं कापलीच नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे नखं वाढलेली असतानाही ती घरातील सर्व कामे अगदी सहजपणे करते. तिला काम करताना नखांमुळे कोणतीही अडचण येत नाही. तिच्या या आवडीची जागतिक विक्रमात नोंद करण्यात आली आहे. असे असले तरी नखांची काळजी घेण्यासाठी तिला बराच वेळ खर्च करावा लागतो. आयना स्वत: नेल आर्टिस्ट आहे. आपल्या नखांवर नेलपेंट लावण्यासाठी तिला एक आठवडा लागतो. दोन्ही हातांच्या नखांना नेलपेंट लावायची झालीच तर एकावेळी नेलपेंटच्या तीन बाटल्या सहज संपतात असंही ती म्हणते. कॉलेजमध्ये असल्यापासून आपली मोठी नखं असावी असं तिला वाटायचं आणि तेव्हापासूनच तिने नखं वाढवायला सुरूवात केली. तिच्या प्रत्येक बोटाचं नख हे दोन फुट लांब आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उमर खालिदला अटक, दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा ठपका

News Desk

निष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड !

News Desk

‘उत्तराखंडाचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा राजीनामा’

News Desk