HW News Marathi
देश / विदेश

केरळ विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेले पायलट महाराष्ट्राचे सुपुत्र होते

केरळ | केरळच्या कोझिकोड विमानतळाजवळ काल (७ ऑगस्ट) झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन दीपक साठे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दीपक साठे यांनी विमान वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. त्यांचे वडील भारतीय सैन्यात ब्रिगेडियन होते. त्यांचे मोठे भाऊ कारगील युद्धात शहीद झाले होते. त्यानंतर आता कॅप्टन दीपक यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

कॅप्टन दीपक साठे हे एक कौशल्यवान आणि निपुण पायलट होते. त्यांना प्रचंड मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर वायुसेनेचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा Sword of Honor या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना प्रेसिडेंट गोल्ड मेडेलसुद्धा मिळालं आहे. याशिवाय त्यांना आणखी काही पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

भारतीय वायुसेनेतील नोकरीनंतर दीपक यांनी एअर इंडियात नोकरी सुरु केली होती. वायुसेनेत त्यांची कुशल लढाऊ वैमानिक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या अनुभवाच्या जोरावरच त्यांना एअर इंडियाची नोकरी मिळाली होती. कॅप्टन दीपक साठे यांनी विमान वाचवण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यांनी दोन वेळा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नात विमानाचा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी साचले होते. त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत घेणार मुख्यमंत्र्यांची भेट! राजकीय चर्चांना उधाण

News Desk

Bhima Koregaon Case : नवलखांची नजकैदेतून सुटका, राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव

swarit

आता लॅपटॉप बॉम्बचा जगाला धोका,

News Desk