HW News Marathi
Covid-19

दिल्लीतील लॉकडाउन वाढवला, वाढत्या कोरोना संसर्गामुळे केजरीवाल सरकारचा निर्णय

नवी दिल्ली | कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीतील परिस्थिती आधी लागू केलेल्या एका आठवड्याच्या लॉकडाऊननंतरही कायम आहे. रुग्णवाढीचा वेग, कोलमडण्याच्या मार्गावर असलेली आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रडकुंडीला आलेली रुग्णालये आणि रुग्णांचे होत असलेले मृत्यू ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने दिल्लीतील लॉकडाऊन आणकी एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या दिल्लीची चौथ्या लाटेनं मात्र थैमान घातलं आहे. कधी नव्हे ती इतकी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून, मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल सरकारने लॉकडाऊन न लावण्याची भूमिका घेतली होती. मात्र, रुग्णसंख्येचा मोठा विस्फोट झाल्यानंतर रुग्णालयावर अतिरिक्त भार पडू लागला. त्यानंतर सरकारने तातडीने लॉकडाउन लागू केला होता.

मागील एका आठवड्यांपासून दिल्लीत लॉकडाउन लागू केलेला आहे. या काळात दिल्लीत रुग्णसंख्येत कोणतीही घट झालेली नाही. उलट ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहेत. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाले असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने लॉकडाउन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.

एका आठवड्यांनी लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सोमवारी सकाळी ५ वाजेपर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे. ‘ऑक्सिजन उत्पादक, पुरवठादार आणि रुग्णालये यांना प्रत्येक दोन तासांनंतरची माहिती मिळावी यासाठी दिल्ली सरकारने पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. यामुळे ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थापनास सुसूत्रता येईल,’ अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

“दिल्लीत कोरोनाचा कहर सुरू असून, त्यामुळे ६ दिवसांचा लॉकडाउन लागू केला होता. आता लॉकडाउन पुढील सोमवारपर्यंत वाढविण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ही दरात घसरण झाली असून, दिल्लीत ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवताना दिसत आहे,” असंही केजरीवाल म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक ! राज्यात सलग चौथ्या दिवशीही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम, आज ५,२५७ रुग्णांची भर

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत:च गाडी चालवत पंढरपुरात दाखल होणार

News Desk

सरकारला बदनाम करण्यासाठी सुरू झालेले हे फेकतंत्र त्यांच्यावरच उलटेल!

News Desk