HW News Marathi
देश / विदेश

मैत्रिणीसोबत सेक्स करतानाचा व्हिडीओ फेसबूकवर केला व्हायरल

तिरुवनंतपुरम(वृत्तसंस्था): आपल्या मैत्रिणीसोबत सेक्स करतानाचे व्हिज्युअल फेसबूकवर लाइव्ह अपलोड केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलसांनी अटक केली आहे. फेसबुकवर लाइक वाढवण्यासाठी त्याने हा धक्कादायक प्रकार केल्याचे तरुणाने सांगितले. परंतु तरुणाची कसून चौकशी केल्यानंतर आपल्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे. लिनू असे या तरुणाचे नाव आहे. तो राजाक्कड येथील एका हॉटेलमधला कर्मचारी आहे.

लिनूच्या गर्लफ्रेंडने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तक्रारकर्ता महिला विवाहीता असून एका मुलाची आई आहे, पण ती आपल्या पतीपासून वेगळी राहते. दोघांची फेसबुकवरच मैत्री झाली होती. फेसबुकवरच ही मैत्री बहारत गेली आणि अनेकदा दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. सहा सप्टेंबर रोजी दोघं पुन्हा भेटले पण यावेळी लिनूने दोघांमधल्या खासगी क्षणांना फेसबुकवर लाइव्ह केलं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हनी ट्रॅपमध्ये अडकले ५० भारतीय जवान ?

News Desk

#NirbhayaCase : आरोपी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

swarit

जम्मू-कश्मीर निवडणुकीदरम्यान जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक

Gauri Tilekar