HW News Marathi
Uncategorized

मोठी बातमी! ‘फेसबुक’ने बदललं आपलं नाव, लोगोतही बदल; जाणून घ्या कारण

नवी दिल्ली । जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असलेल्या फेसबुकचं रिब्रॅण्डिंग होत आहे. याच पार्श्वभूमीवर, आता फेसबुकचं नाव बदलण्यात आलं आहे. फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील अधिकृत घोषणाही केली आहे यानुसार, आतापासून फेसबुकचं नवं नाव ‘मेटा’ असं असणार आहे. मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादनं निर्माण करुन युझर्सना आकर्षित करण्याच्या हेतूने फेसबुकचं नाव बदलून ‘मेटा’ हे नवं नाव देत असल्याचं स्पष्टीकरणही कंपनीकडून देण्यात आलं आहे. युझर्सना हा नवा आणि मोठा बदल कसा वाटतोय? हे पाहणं जास्त औत्सुक्याचं आहे.

कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना मार्क झुकरबर्गने सांगितलं की, “कंपनीत सुरू असलेली कामं ही फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याचं सांगत मूळ कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे, आम्ही मेटा या नावाने ओळखले जाणार आहोत.” दरम्यान, या निर्णयावर आता युझर्सच्या काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. लोक जेव्हा इंटरनेटच्या मदतीने व्हर्च्युअल विश्वामध्ये फिरतात तेव्हा त्याला मेटाव्हर्स म्हणतात. ज्यात डिजीटल स्पेसचाही समावेश असतो.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10114026953010521&id=4

लोगोतही बदल

फेसबुकने फक्त नावच नाही तर आपला लोगोही बदलला आहे. आता F ऐवजी फेसबुकचा लोगो म्हणून इन्फिनिटी चिन्हं हा कंपनीचा लोगो असणार आहे. दरम्यान, फेसबुकला जरी नवं नाव आणि लोगो देण्यात आलेला असला तरी त्यांच्या उप कंपन्यांची जुनीच नावं कायम राहणार आहेत. ज्यामध्ये विशेषतः फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलससह इतर कंपन्यांचा समावेश आहे. या कोणत्याही अ‍ॅप्सची नावं बदलली जाणार नसल्याचं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंचा ‘नाईट लाईफ’चा निर्णय लांबणीवर पडणार?

News Desk

आजपासून पुन्हा कोट्यधीश बनण्याची संधी!

News Desk

शरद पवारांनी घेतली शेलारांची भेट

swarit