नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. संघाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्यानं त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, काल देशात १ लाख ३० हजार हून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातही महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार अधिक झपाट्यानं होतं असल्याचं चित्र आहे. राज्यात आजपासून विकेंड लॉकडाऊनही सुरू झालं आहे. नागपूर, पुणे आणि मुंबई यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आणि कोरोनासोबत लढा देण्यासाठी उपाययोजनाही सुचवल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्री आज सर्व पक्षीय नेत्यांसोत महत्वाची बैठकही घेणार आहेत.
RSS Sarsanghchalak Dr. Mohanji Bhagwat today tested Corona positive. He has normal symptoms and admitted to Kigsway hospital Nagpur.
— RSS (@RSSorg) April 9, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.