Site icon HW News Marathi

मंकीपॉक्सला WHO ने घोषित केली जागतिक आरोग्य आणीबाणी

मुंबई। मंकीपॉक्स आजाराची साथ जगातील ७०हून अधिक देशात पसरली आहे. मंकीपॉक्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने काल (२३ जुलै) मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे.
दरम्यान, केंद्र सरकार मंकीपॉक्ससंदर्भात सतर्क झाले असून मंकीपॉक्सच्या रुग्ण ओळखून त्यांच्यावर योग्य तो उपचार करण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने विमानतळ आणि बंदरांवर कडक तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतातील केरळ राज्यात मंकीपॉक्सच्या एक रुग्ण आढळून आला होता. हा रुग्ण काही दिवसांपूर्वी यूएईवरून परतला होता. तसेच मंकीपॉक्सच्या दुसरा रुग्ण देखील केरळमध्ये आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर केरळला सतर्क राहण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.
Exit mobile version