HW News Marathi
देश / विदेश

Union Budget 2021 | मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटी 

नवी दिल्ली | आज (१ फेब्रुवारी) दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडत आहेत. कोरोना काळात मंदीचं सावट आलेल्या अर्थसंकल्पाला त्यानिमित्ताने ‘आर्थिक लस’ देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येईल.

देशाच्या अर्थसंकल्पाकडून सामान्य व्यक्तीपासून ते उद्योगपतींना मोठ्या अपेक्षा असतात. प्रत्येक क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून काही मदतीच्या अपेक्षा असतात. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आज विविध क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात येतील. त्यानिमित्ताने सरकारच्या तिजोरीत उत्पन्न कोणकोणत्या मार्गाने येते आणि ते उत्पन्न नंतर कोणत्या गोष्टींवर खर्च केले जाते याचं गणित मांडण्यात येईल.

निर्मला सीतारामण यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –

मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद

रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी १.१० लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीची तरतूद

दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाइनचा विस्तार करणार

नागरी बस वाहतुकीसाठी १८ हजार कोटी

नागपुर मेट्रो २ प्रकल्पासाठी ५९७६ कोटींची तरतुद

७०२ किमीच्या मेट्रोचे काम पुर्ण

नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी

२२ शहरांत १०१९ किमीच्या मेट्रोचे काम सुरु

१.१ लाख कोटी रुपये रेल्वेवर खर्च करण्यात येणार

कोची, चेन्नई , बंगळुरुमधील मेट्रो प्रकल्पांना केंद्राकडून मदत होणार

सार्वजनिक बस परिवहन योजनेसाठी नवी योजना, विद्युत क्षमतेसाठी 139 गीगा वाट्सचा फायदा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आप’ने गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी इसुदान गढवी यांच्या नावाची केली घोषणा

Aprna

‘शिवसेना’ काढताना वंशंजांना विचारलं होतं का, ‘शिवसेना नको आता ठाकरे सेना करा’ उदयनराजेंचं सेनेला चॅलेंज….

Arati More

माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे !

News Desk