HW News Marathi
देश / विदेश

“पाच दिवसात ३.२० पैशांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ; मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन?”

मुंबई | देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला असून यामध्ये पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता काबीज केली आहे. मात्र, निकाल लागल्यानंतर इंधन दरात वाढ होणार अशी शंका वर्तवण्यात येत होती. अन् घडलेही तसेच. आधीच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली असताना आता पेट्रोल, डिझेलच्या किमतीतही सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसात ३.२० पैशांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली आहे. तर गॅसची ५० रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे मोदीजी तुम्ही सांगितलेले अच्छे दिन कुठे आहेत, असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, या राज्यांचा निकाल लागताच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांचा भडका वाढला आहे. तर याआधी मोदींनी निवडून यायच्या आधी जनतेला जी आश्वासनं दिली होती व ही आश्वासनं देताना “अच्छे दिन” अर्थात चांगले दिवस येणार अशी घोषणा वारंवार केली होती. त्यावरूनच महेश तपासे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. २०१४ च्या निवडणुकीमध्ये सबंध देशाला ‘अच्छे दिन’ चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने खऱ्या अर्थाने देशाच्या नागरिकांवर पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीच्या निमित्ताने फार मोठे आर्थिक संकट आणले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

मोदीसाहेबांच्या राज्यांमध्ये केंद्र सरकार कुठलाच आर्थिक बोजा सहन करायला तयार नाही म्हणून कुठलीही दरवाढ झाली तर ती थेट नागरीकांच्या माथ्यावर मारायची असेच धोरण भाजप सरकारचे आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देशातल्या अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित आहे. परंतु, काश्मिर फाईल सारख्या विषयाची जेव्हा अर्थमंत्री चर्चा करतात तेव्हा या सरकारचं लक्ष नेमकं कुठे आहे हे आपल्याला दिसून येते, असेही महेश तपासे म्हणाले.

महागाईने आठ महिन्यांचा उच्चांक गाठलेला असताना देखील मोदी सरकार कुठल्याच प्रकारे नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील नाही. ही वस्तुस्थिती आज जनतेपासून लपलेली नाही अशी टीकाही महेश तपासे यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AyodhyaVerdict : जाणून घ्या.. अयोध्या प्रकरणाचा घटनाक्रम

News Desk

#RussiaUkraineConflict : रशियाचा युक्रेनवर मिसाईल हल्ला; “मध्ये आलात तर महागात पडेल” – पुतीन यांची धमकी

Aprna

कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यम यांची देशाच्या नव्या आर्थिक सल्लागार पदी नियुक्ती

News Desk