HW News Marathi
देश / विदेश

नेपाळ लिपुलेख, कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा प्रकाशित करणार

नवी दिल्ली | कोरोनाच्या संकटाने तर सगळे हैरान आहेतच मात्र राजकीय वर्तृळातही अनेक चर्चा आणि घडामोडी घडत आहेत. भारताने लिपुलेख पासपर्यंत रस्ता बांधलेला आहे. भारत, नेपाळ आणि चीन या तीन देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या ट्रायजंक्शनजवळ हा रस्ता बांधण्यात आला आहे. लिपूलेख पास मार्गामुळे कैलाश मानसरोवरला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरुंचा वेळ वाचणार आहे. दरम्यान, भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या या मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला होता. दरम्यान, आता नेपाळ लिपुलेख आणि कालापानी हा नेपाळचाच भाग असल्याचा नकाशा प्रकाशित करण्यात येणार आहे.

नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली यांनी यासंदर्भात ट्विटद्वारे माहिती दिली आहे. मंत्रिमंडळाने नवा नकाशा जारी करण्यास मान्यता दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामध्ये ७ प्रांत. ७७ जिल्हे आणि लिपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीसह ७५३ स्थानिक प्रशासनिक मंडळंही दाखवण्यात येणार असल्याचे त्यांनी लिहिले आहे. अधिकृत नकाशा लवकरच मिनिस्ट्री ऑफ लँड मॅनेजमेंटद्वारे जारी करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना लसीकरणाची मोहीम संपल्यानंतर CAA लागू करणार; अमित शाहांनी केले मोठे वक्तव्य

Aprna

हंदवाड्यात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, १ जवान शहीद

News Desk

काँग्रेसला महाराष्ट्रात क्रमांक १ चा पक्ष बनवू | नाना पटोले

News Desk