Site icon HW News Marathi

जगात ‘या’ देशात फटाक्यांच्या आतिषबाजीत झाले नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई | जगभरात सर्व जण सरत्या वर्षाला मोठ्या जल्लोष निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या (Happy New Year) स्वागतासाठी सज्ज झाले आहे. भारतीय प्रमाण वेळपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे असल्याल्या देशात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले आहे. जगात न्यूझीलंडच्या (New Zealand) ऑकलंडमध्ये सर्वात अगोदर नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. या नवीन वर्षाच्या जल्लोषाचे व्हिडिओ सध्या ट्वीटरवर व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडमध्ये देशात मध्य रात्रीचे 12 वाजून गेले आहेत. तर ऑकलंड येथील स्काय टॉवरवर आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करत नवीन नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. ऑकलंडमध्ये स्काय टॉवर परिसरात मोठ्या संख्यने नागरिक नव वर्षाच्या जल्लोषात स्वागत केले आहे.

भारतात सुद्धा सरत्या वर्षाच्या निरोपासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. सरत्या वर्षाला आनंदात निरोप देण्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव वर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

Exit mobile version