HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र

मराठमोळ्या निला विखे-पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान सल्लागार पदी निवड

अहमदनगर | मराठमोळी निला विखे-पाटील या स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागार म्हणून निवड झाली आहे. स्वीडनचे नवे पंतप्रधान स्टिफन लोफनवन यांनी गेल्याच महिन्यात सांभाळली आहे. तर निला या त्यांच्या सल्लागार असणार आहे.  निला या प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे-पाटील यांच्या कन्या असून केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी आहेत.

स्वीडनमध्ये सोशल डेमोक्रॅट-ग्रीन पार्टीचे सरकार आहे. ३२ वर्षांच्या निला विखे-पाटील काम पाहतील. निला या अर्थ विभागाशी संबंधित विभागांवर काम करतील. कर, अर्थसंकल्प, गृहनिर्माण या संबंधित विषय त्या हाताळणार आहेत, अशी माहिती निला यांच्या वडिलांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. याशिवाय स्टॉकहॉम महानगपालिकेच्या परिषदेवरही त्यांची निवड झाली आहे. स्टॉकहॉम स्वीडनच्या राजधानीचे शहर आहे.

निला यांनी याआधीच्या सरकारच्या सल्लागार म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच निला या ग्रीन पार्टीच्या सक्रीय सदस्य असून स्टॉकहॉम ग्रीन पार्टीच्या निवडणूक समितीच्या सदस्य मंडळातही त्यांचा समावेश आहे. निला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला. सुरुवातीचे काही काळ त्या महाराष्ट्रात वास्तव्याला होत्या.

निला यांनी गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएची पदवी घेतली आहे. अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचाही त्यांचा गाढा अभ्यास आहे. निला या स्वीडिश यंग ग्रीन्स, ग्रीन पार्टी गोथेनबर्ग, ग्रीन स्टुडंट्स ऑफ स्वीडनच्या सदस्य आहेत. याशिवाय ग्रीन पार्टी स्टॉकहॉमचे सदस्यत्वही त्यांच्याकडे असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले.

Related posts

विधानपरिषदेच्या चार जागांचा आज निकाल

News Desk

भगतसिंग यांच्या विषयी तुम्हाला हे माहित आहे का ?

News Desk

सीबीआय प्रकरणी ट्विट केल्यामुळे प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

News Desk