HW News Marathi
देश / विदेश

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल

नाशिक | जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील कलान गावात बुधवारी (२७ जानेवारी) भारतीय वायू दलाचे लढाऊ हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वैमानिक निनाद मांडवगणे हे शहीद झाले. दरम्यान आज (१ मार्च) निनाद मांडवगणे यांचे पार्थिव त्यांच्या नाशिक येथील निवासस्थानी आणण्यात आले आहे. भारत-पाकिस्तानमधील संबंध सध्या प्रचंड ताणले गेले आहेत. त्यामुळे दक्षतेखातर नाशिकमध्येही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहीद निनाद यांचे पार्थिव दर्शनासाठी नाशिक येथील मैदानात ठेवण्यात येणार आहे. भारतीय वायू सेनेकडून शहीद निनाद मांडवगणे यांना मानवंदना देण्यात आली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हनीप्रीत-राम-रहीम जेलमध्ये येणार एकत्र ?

News Desk

“मविआ सरकारने एक उमेदवार मागे घ्यावा, मग घोडेबाजाराचा प्रश्नच उरत नाही,” फडणवीसांची प्रतिक्रिया

Aprna

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, याकडे जय, पराजयच्या दृष्टीने बघू नये !

News Desk