HW News Marathi
देश / विदेश

काश्मीर मुद्यावरून मलालाने केलेल्या ट्वीटवर नेटकऱ्यांची सडकून टीका

नवी दिल्ली | भारतीय सरकारने कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला असून पाकिस्ताने भारतासोबत सर्व व्यापारी संबंध तोडले, हवाई वाहतूक बंद केली आणि समझौता एक्स्प्रेस देखील बंद करण्यात आली आहे. भारताच्या या निर्णयानंतर मुलींच्या शिक्षणासाठी आपले सबंध आयुष्य अर्पण करणाऱ्या नोबल पारितोषिक विजेत्या मलाला युसूफझाई हिने ट्वीट करत काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर भीती व्यक्त केली. मलालाच्या या ट्वीटनंतर सोडल मिडीयावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

मलालाने या ट्वीटमध्ये म्हटले की, “मी जेव्हा लहान होते, जेव्हा माझे आई-बाबा लहान होते, जेव्हा माझे आजी-आजोबा तरुण होते तेव्हापासूनच काश्मिरी लोक युद्धाचे सावट असलेल्या क्षेत्रात राहत आहेत. गेल्या ७ दशकांपासून काश्मिरी मुलांना गंभीर हिंसेच्या वातावरणात राहावे लागत आहे”. मलालाच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी म्हटले की, “पाकिस्तानमधील बलुचिस्थानमधील अल्पसंख्यांची आठवण का येत नाही ?”, असे प्रश्न विचारून तिच्यावर टीका केली आहे.

“दक्षिण आशिया हे आपले घरच असल्यामुळे आपल्याला काश्मीरची अधिक काळजी आहे, असेही मलालाने लिहिले आहे. दक्षिण आशियात १.८ बिलियन लोक राहतात. यात काश्मिरींचाही समावेश आहे. आम्ही विविध संस्कृती, धर्म, भाषा, खानपान आणि परंपरांना मानतो”, असे मलालाने या ट्वीटमध्ये म्हटले आहे. मलाला पुढे असे लिहिते की, “एकमेकांना दु:ख देत राहणे हा काही पर्याय होऊ शकत नाही. या हिंसेच्या वातावरणात मुले आणि महिला सर्वाधिक अत्याचार होत असतात. तर त्यांना युद्धाचे सर्वात भीषण परिणाम झेलावे लागत आहेत.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात लष्कर, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान घुसले

News Desk

देशात पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही !

Gauri Tilekar

तिहेरी तलाकवर हुसेन दलावाईचे वादग्रस्त विधान

swarit