Site icon HW News Marathi

मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या टी. राजा सिंह यांचे भाजपकडून निलंबन

मुंबई | तेलंगणातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह (T Raja Singh) यांनी पक्षांनी निलंबित केले आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी टी राजा यांना पोलिसांनी आज (23 ऑगस्ट) अटक केले आहे. या प्रकरणी भाजपने कडक करावाई करत टी राजा यांना निलंबित केले असून 10 दिवसांत त्यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागितले आहे.  टी राजा यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये लोक रस्त्यावर उतरण विरोध करत आहेत.

टी राजा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर टी राजा आज सकाळी हैदराबाद पोलिसांनी अटक केले. टी राजा यांचे आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. टी राजा यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा हैदराबादमध्ये कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमात टी. राजा यांना विरोध केला होता. तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी मुनव्वर फारुखीला परवानगी दिली. फारुखीकडून हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त टिप्पणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फारुकींचा कार्यक्रम हा 20 ऑगस्ट रोजी होणार होता.

भाजपला हैदराबादमधील शांतता पाहावत नाही – ओवेसी

या प्रकरणावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी भाजपवर टीका करत म्हणाले, “भाजपला हैदराबादमधील शांतता पाहावत नाही. भाजपला हैदराबादमध्ये सामाजिक सलोखा टिकू द्याचा नाही. भाजपला मुस्लिमांना भावनिक आणि मानसिक त्रास द्याचे त्यांचे धोरण आहे.”

 

Exit mobile version