Site icon HW News Marathi

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांचे देशासाठी 5 मोठे संकल्प करण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली | यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे (Independence Day) पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी सलग नवव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशाला संबोधित केले आहे. यावेळी पंतप्रधानांनी विविध मुद्यांवरून भाष्य केले. “स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी जगभरातील भारतप्रेमींना, भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो,” असे पंतप्रधान म्हणाले. “देशासमोर येणाऱ्या कोणत्याही संकटचा पूर्णताकदीने समोरे गेलो आहे. भारताने आतापर्यंत जे ठरवले, ते सर्व करून दाखवले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने देशवासीयांना पाच संकल्प करणे आवश्यक आहे,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान म्हणाले, “विकसित भारत हा सर्वात मोठा संकल्प आहे. दुसरा संकल्प म्हणजे आपल्या मनातील कोपऱ्यात गुलामीचा एकही अंश अजूनपर्यंत आहे. गुलामीचा अंश मिटवणे हा दुसरा संकल्प आहे. आपल्याला गुलामीची छोट्यातील छोटी गोष्ट आपल्यात दिसून येत असेल. आपल्या आजू बाजूला दिसू येते आपल्याला यातून मुक्ती मिळवलीच पाहिजे.  आपल्याला आपल्या वारशावर अभिमान असणे हा तिसरा संकल्प आहे. या वारसा प्रति आपल्याला अभिमान असला पाहिजे. चौथा संकल्प ही तितकाच महत्वाचा आहे. आणि चौथा संकल्प म्हणजे एकता आणि एकजूता –  130 देशवासियांनमध्ये एकताची ताकद म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नासाठी हे आपला संकल्प आहे. आणि पाचवा संकल्प आहे. नागरिकांकडून कर्तव्याचे पालन हा पाचवा संकल्प आहे. नागरिकांचे कर्तव्य यात पंतप्रधान देखील वेगळा नाही येत. मुख्यमंत्री पण वेगळा नसतो तो पण नागरिक आहे. आपल्या दरवर्षी येणाऱ्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक खूप मोठी शक्ती आहे.”

पंतप्रधानांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाही हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारच्या मुद्यावर म्हणाले, “भारतासमोर दोन मोठे आव्हान आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे आहेत. भ्रष्टाचाराने देशाला पोखरत असून घराणेशाही राजकारणातून संधी हिसकावून घेत आहेत.  कोणाकडे राहायला जागा नाही. तर कुणाकडे चोरीला माल ठेवायला जागा नाही. यापूर्वी सरकारांमध्ये बँका लुटून पळून गेलेल्या मालमत्ता जप्त केल्या जात आहे. तर त्या लोकांना परत आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही एक गंभीर पाऊल उचलत आहोत” असे ते लाल किल्ल्यावर देशाला संबोधित करताना म्हणाले. “राजकारणात तर घराणेशाही असतेच, परंतु, क्रीडा क्षेत्रातही होती. एक मोठा घटक होता. यामुळे अनेक खेळाडूंची प्रतिभा वाया गेला असून खेळाडूंच्या निवडत पारदर्शकतेच्या अभावा या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत.”

 

 

Exit mobile version