HW News Marathi
देश / विदेश

शिवजयंतीनिमित्त पंतप्रधानांनी महाराजांना केले नमन

मुंबई | आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शिवजयंतीनिमित्त मोठा उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी होत असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात अत्यंत साध्या पध्दतीने जयंती साजरी करण्यात आली होती. मात्र, आता दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे यंदा अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे.


दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आदरांजली वाहिली आहे. महाराजांचे समर्थ नेतृत्व आणि सामाजिक कल्याणावर त्यांनी दिलेला भर पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. मोदींनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करतानाचा फोटोही शेअर केला आहे. याशिवाय त्यांनी मराठीतून देखील ट्वीट केलं आहे. 

आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

“छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त मी नमन करतो. त्यांचे सर्वोत्कृष्ट नेतृत्व आणि समाज कल्याणाचा आग्रह अनेक पिढ्यांसाठी प्रेरक ठरला आहे. सत्य आणि न्यायाच्या बाजूने उभे रहाताना त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत”, असे मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरा करणे आरोग्याला घातक

News Desk

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत मोठी कपात

Gauri Tilekar

न्यायाधीश एस. मुरलीधर काँग्रेसचे निकटवर्तीय असलेली ‘ती’ व्हायरल पोस्ट खोटी

swarit