HW News Marathi
देश / विदेश

ट्रम्प अध्यक्ष होताच एकाची आत्महत्या

सॅन फ्रॅन्सिस्को – कुठल्याही निवडणूकीत विजयी झाल्यानंतर शक्यतो लोकं आनंदोत्सव साजरा करतात. मात्र, अमेरिकेत एक वेगळाच किस्सा घडलाय. ही घटना ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

अँड्रियन ब्लेक या २४ वर्षीय तरूणाची ही गोष्ट आहे. तो स्टारबक्स या कंपनीचा कर्मचारी होता. एका अपघातानंतर तो गेल्या सात महिन्यांपासून कोमात होता. त्यानंतर तो गेल्याच आठवड्यात कोमातून बाहेर आला. कोमातून बाहेर आल्यानंतर त्याला कळाले की, अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे. हे समजल्यानंतर अँड्रियन यानं आत्महत्या केली. अत्यंत कठीण परिस्थितीतून सॅन फ्रॅन्सिस्कोच्या सामान्य रूग्णालयातल्या डॉक्टरांनी अँड्रियनवर उपचार करून त्याला तंदुरूस्त केलं होतं.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील ट्रम्प यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या हिलरी क्लिटंन यांचे अँड्रियन आणि त्याचं कुटुंब हे समर्थक आहे. त्यामुळं ट्रम्प यांची अध्यक्षपदाची निवड पचवण अत्यंत कठीण होतं, अशी प्रतिक्रिया अँड्रियनच्या आईनं दिलीय. ट्रम्प यांची निवड झाल्याची बातमी आम्ही अँड्रियन पासून फार काळ लपवून ठेवू शकलो नाही. हिलरी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचं आम्ही त्याला सांगताच अँड्रियन कमालीचा आनंदी झाला होता. अँड्रियनला कुठल्याही तणावापासून दूर ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

मात्र, जेव्हा अँड्रियनला अध्यक्षपदी ट्रम्प यांची निवडून आल्याचं कळालं तेव्हापासून तो कमालीचा तणावाखाली वावरत होता. त्यानं खाणं-पिणं बंद केलं त्याला कितीही मोठी घटना काल्पनिकरित्या सांगितली तरी अँड्रियन हा प्रतिसाद देतच नव्हता. अँड्रियननं आपल्या मित्रांना एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात जगण्याचा विचारच करू शकत नसल्याचं त्यानं लिहिलं होतं.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमच्या बलिदानाची किंमत म्हणून काश्मीरला स्वातंत्र्य मिळवूनच देऊ !

News Desk

“…आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने भागवत कराड महापौर झाले”, गडकरींनी सांगितला किस्सा

News Desk

कुणी मुद्दामहून आमच्या वाटेला आले तर आम्ही त्याला सोडत नाही !

News Desk