Site icon HW News Marathi

“आम्ही नागालँडच्या मुख्यमंत्र्यांबरोबर, पण…”; शरद पवारांनी भूमिका घेत म्हणाले

मुंबई | “आम्ही नागालँडच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आहे. पण, भाजपला नाही”, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. नुकतेच नागालँडमध्ये (Nagaland) विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यात नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपीचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा नागालँडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नुकताच नागालँडच्या सरकारचा शपथविधी संपन्न झाला आहे.

शरद पवार म्हणाले, “आम्ही नागालँडच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आहे.  त्या राज्याचे एकदरीत चित्र बघितल्यानंतर तिथे एक प्रकारचे स्थैर्य येईला. आमची मदत तिथल्या मुख्यमंत्र्यांना होत असेल. ती करावी,  हे आमचे मत आहे. त्या भाजप नाही. दुसरे भाजपचेच बोलायचे असेल तर मला एका गोष्टीचे आर्श्चय वाटते. मेघालय आणि शेजारच्या राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या प्रचाराला देशाचे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री दोघेही गेले होते. आणि प्रधानमंत्र्यांनी मेघालयाच्या प्रचारामध्ये तिथले मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचारामध्ये बुडलेले आहेत. आणि त्यांचा पराभव करा, असे म्हटले होते. यानंतर निवडणुका झाल्या, भाजप हे त्यांच्या शपथविधीमध्ये ही सहभागी झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात आमच्या सहकार्यांना घेतील ही भूमिका आम्ही घेतलेली नाही.”

 

Exit mobile version