HW News Marathi
देश / विदेश

पाकला आता भारतीय टोमॅटोही झोंबले

इस्लामादाबाद – पाकिस्तान सध्या महागाईच्या भडक्याने पेटलेला आहे. तेथे टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. असे असले तरी भारताकडून टोमॅटो खरेदी करणार नसल्याची आडमुठी भूमिका त्यांनी घेतली आहे. पाकिस्तानचे अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात बोसान यांनी ही माहिती दिली.

पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोचे उत्पन्न व आयात घटलेली आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत टॉमेटो प्रतिकिलो ३०० रुपये दराने विकला जात आहे. दरवर्षी पाकिस्तान भारताकडून टॉमेटोची आयात करतो. पण यावर्षी भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सीमेपलिकडून येणाऱ्या कंटेनरना देशात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मागणी असूनही त्या तुलनेत पुरवठा होत नाही. दरम्यान, भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असली तरी अनेक जीवनावश्यक वस्तू दोन्ही देश एकमेकांना आयात- निर्यात करतात. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते, असे असताना टोमॅटो खरेदी करण्यास नकार देऊन पाकने आपली हेकेखोरी दाखवून दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार दसऱ्यापूर्वी बोनस

News Desk

पाक सरकारच्या संकेतस्थळावर चक्क भारताचे राष्ट्रगीत

News Desk

या वर्षी भारताचा विकासाचा दर 7.8% राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज

News Desk