HW Marathi
देश / विदेश राजकारण

कोरोनाशी दोन करण्यासाठी खेळाडूंची मदत

मुंबई | कोरोना जोरदार फटका देशातील सर्वच स्तरावरील बाबींना लागला आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या मॅचही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, बीसीसीआयलाही याचा फटका बसला आहे. परंतू, देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली लॉकडाऊनमधील वंचितांना ५० लाखांची मदत करणार आहेत. याची थेट माहिती सौरव गांगूली यांनी स्वत दिली जरी नसली तरी त्याची घोषणा बंगाल क्रिकेट संघाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

दरम्यान, सौरव गांगुली ही मदत थेट पैसे देऊन करणार नसून ५० लाख रुपयांचे तांदूळाचे वाटप करणार आहेत. बंगालमध्येही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता पाळण्यात येत आहे. काही लोकांना बंगालमधील शाळेमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी लाल बाबा चावल या कंपनीला सोबत घेत ही मदत करण्याचा विचार केला आहे. कोरोनाच्या वाढत्या विळख्यात अनेकजण अडकले आहेत. त्यांच्या मदतीसाठी राजकीय नेते, उद्योजक, कलाकार तसेच खेळाडूही पुढे सरसावत आहेत. सौरव गांगुली सोबतच भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा रोजंदीर कामगारांना रोज २ किलो तांदूळ, २ किलो गव्हाचे पीठ, २ किला डाळी, अर्धा किलो साखर, ५०० मिली. तेल, १०० ग्रॅम चहा पावडर, एक किलो मीठ आणि दोन साबण यांचा पुरवठा करत आहे.

Related posts

नवनीत राणा-भाजपमधील संघर्ष चिघळणार ?

News Desk

रजनीकांत यांचं राजकारण भगवं नसावं, | अभिनेता कमल हासन

Adil

‘पेढेवाले मोदी’ म्हणणारे आणि आता इंदिराजीसुद्धा भाजपला प्रिय वाटतात, आनंद आहे…..सामनातुन टिका

Arati More