HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींचा ७१ वाढदिवस : देशभरातून शुभेच्छांची उधळण

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्तानं भाजपकडून येत्या २० दिवसांपर्यंत ‘सेवा आणि समर्पण मोहीम’ राबवण्यात येणार आहे. या निमित्तानं पंतप्रधान मोदींवर देशातूनच नाही तर जगभरातून शुभेच्छांची उधळण करण्यात येतेय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासहीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मोदींच्या रुपात देशाला सशक्त आणि निर्णायक नेतृत्व मिळालंय

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निरोगी राहून दीर्घायुष्य प्राप्त करत आपल्या ‘अहर्निश सेवामाहे’ भावनेनं राष्ट्रसेवेचं कार्य करत राहण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा, असं म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या आहेत.’देशाचे सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्याची कामना करतो. मोदींच्या रुपात देशाला सशक्त आणि निर्णायक नेतृत्व मिळालंय. काही दशकांपासून आपल्या हक्कांपासून वंचित असलेल्या कोट्यवधी गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडून केवळ त्यांना समाजात सन्माननीय स्थान दिलं नाही तर एका प्रजावत्सल नेतृत्वाचं उदाहरणच त्यांनी जगासमोर मांडलं’ अशा शब्दांत अमित शहा यांनी मोदींचं या निमित्तानं कौतुक केलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवार विधानसभा निवडणूक लढवणार !

News Desk

राहुल गांधींचा अर्ज दाखल, वायनाडमध्ये काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन

News Desk

शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Aprna