मुंबई | टेस्ला आणि स्पेस एक्सचे इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. इलॉन मस्कच्या फोटोमध्ये भारतीय वंशाच्या एका मुलासोबत आहे. इलॉन मस्कसोबत असलेला हा मुलगा पुण्यातील असून त्याचे नाव प्रणय पाटोळे आहे. प्रणय पाटोळे हा इलॉन मस्कचा ट्विटरवरील मित्र आहे. इलॉन मस्क आणि प्रणय पाटोळे यांच्या ट्वीटला मिश्किल उत्तरे देत असतात. आता या दोघांनी प्रणयने टेक्सासमधील गिगाफॅक्टरीमध्ये जाऊन भेट घेतली आहे.
प्रणयने इलॉन मस्कसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला. प्रणय ट्वीटरवर फोटो शेअर करताना म्हटले, “इलॉन मास्क यांना गीगाफॅक्टरी टेक्सास भेटून मला खूप छान होती. मास्क हे इतके साधे आणि नम्र व्यक्ती मी कधीच पाहिली नाही. तुम्ही लाखो लोकांसाठी प्रेरणा स्थान आहात”, असे म्हणाले.
मस्क आणि पाटोळे हे दोघे 2018 पासून ट्विटरवर मित्र आहेत. हे दोघे ट्विटरवर अनेक विषयांवर चर्चा करत असतात. हे दोघे एकमेकांच्या मज्जेशीर रिप्लाय देत असतात. हे दोघेही स्पेस आणि कार हे दोघांना चर्चा करत असतात. 2018 मध्ये प्रणय इंजिनीअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत असतात. तेव्हा प्रणयने टेस्लाच्या स्वयंचलित विंडस्क्रीन वायपर्समधील त्रुटींबद्दल ट्विट केले होते. मस्कने प्रणयच्या ट्वीटला उत्तर दिले होते. यानंतर दोघांमध्ये ट्वीटरवर ओळख झाली. प्रणय सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) साठी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो.