HW News Marathi
देश / विदेश राजकारण

“…सर्व समर्थक उड्या मारत होते”, पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर अप्रत्यक्षरित्या टीका

मुंबई | “काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, सर्व समर्थक उड्या मारत होते”, असा अप्रत्यक्षरित्या टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या काल भाषणावर केली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज (8 फेब्रुवारी) सातवा दिवस आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर अभिनंदन प्रस्तावावर सत्ताधारी आणि विरोधकांनी चर्चा सुरू आहे. राहुल गांधींनी लोकसभेत मंगळवारी (7 फेब्रुवारी) हिंडेनबर्गच्या अदानी समूहाच्या (Adani Group) अहवालावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानींच्या काय संबंध?, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आणि अदानींचा जुने फोटो लोसभेत दाखविले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानींच्या काय संबंध?, असा सवाल ही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शेरोशायरी करत राहुल गांधीवर निशाणा साधला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींच्या भाषणावर टीका करताना म्हणाले, “काही लोकांच्या भाषणातून त्यांची क्षमता, योग्यता समजते. हे लक्षात येते, की मी काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, सर्व समर्थक उड्या मारत होते. अनेक जणांनी आनंदी होऊन भाषणाचे कौतुक करत होते की, ‘ए हुई ना बात’, झोपही आली असेल. यामुळे कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. कदाचित ते आज उठले पण नसतील. आणि अशा लोकांसाठी बोलले जाते की, खूप चांगल्या पद्धतीने बोलले आहेत. “ये  कह कह के हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है”

 

राहुल गांधी नेमके काय म्हणाले

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार ठरावावर भाषण करताना राहुल गांधी म्हणाले, “माझ्या भारत जोडो यात्रेदरम्यान मी  केरळ, तमिळनाडूपासून हिमाचलपर्यंत प्रत्येक राज्यात अदानींचेच नाव ऐकू येते होते. तरुण विचारयाचे की, आम्हालाही अदानींसारखे स्टार्टअप सुरू करायचे आहे. अदानी हे जो व्यवसाय हाता घेतात. तो यशस्वी होतो. अदानी 2014 मध्ये जगातील श्रीमंतांच्या यादीत 609 क्रमांकावर होते. मोदी दिल्लीत आल्यानंतर अदानी थेट दुसऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचले”, असा आरोप त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

“पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यात काय संबंध?”, राहुल गांधींनी जुना फोटो दाखवित केले सवाल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीर अन् लडाख मध्यरात्रीपासून केंद्रशासित प्रदेश

News Desk

आनंदवार्ता ! ‘चांद्रयान- २’ चे यशस्वी प्रक्षेपण

News Desk

मुजफ्फरपूरमध्ये राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल

News Desk