HW News Marathi
देश / विदेश

नौदलाचा नवा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई | भारतीय नौदलाचा नवा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) समर्पित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटले आहे.  देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (2 सप्टेंबर) आयएनएस विक्रांत यांची लोकार्पण सोहळा पार पडला.

 

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज 2 सप्टेंबर 2022 या ऐतिहासिक तारखेला इतिहास बदलून टाकणारी आणखी एक घटना घडली आहे. आज भारताने गुलामीचा एक खून आणि गुलामीच्या एक ओझे आपल्या झातीवरून उतरवून उतरविले आहे. आजपासून भारतीय नौदलाला एक नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजवर गुलामीची ओळख बनली होती. पंरतु, आता आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरित नौदलाचा नवा ध्वज समुद्र आणि अवकाशात फडकणार आहे. रामधारी सिंह दिनकर त्यांनी त्यांच्या कवितेत लिहिले की, नवीन सूर्य की नई प्रभा, नमो, नमो। नमो स्वतंत्र भारत की ध्वजा, नमो, नमो…आज या ध्वज वंदनबरोबरच मी नवीन ध्वज नौदलाचे जनक छत्रपती वीर शिवाजी महाराजांना समर्पित करतोय. हा नवा ध्वज भारतीय नौदलाचे आत्मविश्वास आणि आत्मसन्मान नवीन ऊर्जा देणार. ”

महिला शक्ती नवीन भारताच्या बुलंदची ओळख होणार

आपल्या सैन्यात कशाप्रकारे बदलाव येत आहे. जेव्हा आयएनएस विक्रांत समुद्र किनाऱ्यांच्या सरक्षणासाठी उतरेल. तेव्हा त्यावर नौदलाची अनेक महिला सैनिक देखील तैनात असणार आहे. अथंग समुद्राच्या शक्तीसोबत महिला शक्ती नवीन भारताच्या बुलंदची ओळख होणार आहे. मला सांगितले आहे की, नौदलात जवळपास 600 महिला ऑफिसर आहेत. पण, आता भारतीय नौदलाने आपल्या सर्व शाखांना महिलांना खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांसाठी जे निर्बंध दूर होत आहेत. जसे समुद्रासाठी कोणतीही मर्यादा नसते, तसेच भारतीय मुलींसाठी देखील कोणतीही मर्यादा किंवा बंधन राहणार नाही. गेल्या 1-2 वर्षापूर्वी महिला ऑफिसरने तारिणी बोटमधून पूर्ण पृथ्वीची परिक्रमा केली होती. आगामी काळात अशा पराक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला पुढे येतील. जगाला आपल्या शक्तीने परिचित करू देतील.

नौदलाचा नवा ध्वज असा आहे

भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजमध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा असून उजव्या बाजूला छत्रपतीन शिवरायांच्या राजमुद्रेच्या आकार आणि दुहेरी किनारवरून प्रेरणा घेऊन नक्षी तयार करण्यात आली आहे. आणि अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असे निळ्या रंगात लिहिले आहे. याबरोबर नांगराच्या खाली ‘सम नो वरुनाह’ हे नौदलाचे ब्रीदवाक्य लिहिण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘INS विक्रांत’ नौदलात सामील

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रघुराम राजन आपचे खासदार

News Desk

जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीचा सात दिवसांत आढावा घ्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk

मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन उभारा ! अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk